घरफोडीतील ७१ तोळे सोन्याचे दागिने व आठ लाखांची रोकड जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडीतील ७१ तोळे सोन्याचे दागिने व आठ लाखांची रोकड जप्त
घरफोडीतील ७१ तोळे सोन्याचे दागिने व आठ लाखांची रोकड जप्त

घरफोडीतील ७१ तोळे सोन्याचे दागिने व आठ लाखांची रोकड जप्त

sakal_logo
By

घरफोडी करणारी टोळी
हिंजवडीमध्ये जेरबंद

पिंपरी, ता. २३ : घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले. सुसगाव येथील घरफोडीतील तब्बल ७० तोळे सोन्याचे दागिने व आठ लाखांची रोकड आरोपींकडून जप्त केली आहे.
अजय सर्जा नानावत (वय २७, रा. करमोळी पुलाजवळ, ता. मुळशी), कन्हैय्या विजय राठोड वय १९, रा. पाथरगाव, ता. मावळ), आशा राजूभाई ठक्कर (वय ४०, रा. कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. सुसगाव येथील पोपट श्रीहरी चांदेरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असताना दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून, घरात शिरलेल्या चोरट्यांनी ११९ तोळे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ५७ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर या घरफोडीतील संशयित आरोपी फेज तीन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अजय व कन्हैय्या यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.