भारतरत्न पं.भीमसेन जोशी महोत्सवाला सुरूवात

भारतरत्न पं.भीमसेन जोशी महोत्सवाला सुरूवात

पिंपरी, ता. ८ ः ‘दुर्गा’, ‘खंबावती’ सारखे राग आणि ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ नाट्यगीताने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४ ची सुरेख सुरूवात झाली. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे वरील तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्‍घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.डॉ. नंदकिशोर कपोते, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली, सहायक आयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, समन्वयक समीर सूर्यवंशी, संगीत शिक्षक उमेश पुरोहित आदी उपस्थित होते.
महोत्सवात डॉ. भरत बलवल्ली यांनी ‘दुर्गा’ रागाने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यांनी गायलेल्या ‘खंबावती’ या रागाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध झाले. ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ या त्यांच्या नाट्यगीताने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शेवटी ‘सुखाचे हे सुख’ आणि ‘हरी म्हणा’ हे दोन अभंग त्यांनी सादर केले. डॉ. बलवल्ली यांना प्रसाद करवेंळकर, प्रशांत पांडव, सखाराम परब, पं. भरत कामत, संतोष साळवे, पंडित समीर सूर्यवंशी, आशय कुलकर्णी, प्राणशु चतुरलाल, विष्णू कुलकर्णी यांनी तबला, पखावज या वाद्यांनी साथसंगत दिली.
शेवटच्या सत्रात विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना पं. मकरंद कुदळे, मिलिंद कुलकर्णी, पं. सुयोग कुडळकर, उमेश पुरोहित, निरंजन लेले, अभिषेक शिनकर, धवल जोशी, जयवर्धन दधीच, दिविज टकले, अझरूद्दीन शेख यांनी हार्मोनिअम आणि बासरी या वाद्यांवर साथसंगत केली. किरण गायकवाड यांनी आभार मानले. तर मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com