

पिंपरी, ता. २९ ः अनेक हॉटेलमध्ये रोज उरलेले अन्न फेकून दिले जाते. त्याचबरोबर अनेकजण शिल्लक अन्न फेकून देतात. मात्र, एकीकडे अन्नाचा कण पोटात जावा म्हणून धडपडणारे जीव आणि दुसरीकडे अन्नाची नासाडी करताना सर्रास दिसत आहे.
आज सकाळी भूक भागवण्यासाठी एक लहान मुलगा कचराकुंडीत अन्न शोधताना दिसून आला. निगडी भोसरी स्पाईन रस्त्यावर कचऱ्यात फेकण्यात आलेल्या पावाची पिशवी वेचताना मन हेलावून टाकणारे चित्र दिसले.
पिंपरी चिंचवड शहर मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी, उद्योगनगरी आणि आयटी हब अशी जगाच्या नकाशावर ओळखले जात आहे. मात्र, शहराच्या अनेक कोपऱ्यावर अन्नाच्या शोधात आलेल्या लोकांची वस्ती पहायला मिळत आहे. एकेकाळी प्राधिकरणाच्या स्पाईन रस्त्यालगत असणारा ‘पॉश’ परिसर आता राहिलेला नाही. स्पाईन रस्त्याच्या आतील हिरवळ असणारी जागा आता बेकायदा कचरा विलगीकरण करण्यासाठी वापरली जाते आहे. रोज पहाटे अशी अनेक कुटुंबे कचरा कुंडी विखरून अन्नाचा शोध घेत असतात.
कोट
एवढ्या मोठ्या शहरात उपासमारी उद्योगनगरीला मेट्रो, स्मार्ट सिटीला अनेक वर्षे मागे घेऊन जाणारी आहे. किती लोक असतील जे किमान एक वेळचे खायला मिळावे म्हणून जिवाचा आटापिटा करत असतील? अनेक उपाय शोधत असतील? किमान आपण अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घेऊ शकतो. भूक असेल तेवढेच अन्न ताटात घ्यावे. उरलेले अन्न फेकून देण्यापेक्षा भुकेल्या व्यक्तीला अन्न द्यावे.
-विनायकराव लाटे, स्थानिक, निगडी भोसरी स्पाईन रस्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.