

पिंपरी, ता. २९ : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वारंवार दिलेल्या त्रासाला कंटाळून वाकड येथे पंधरा वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुरुवातीला वाकड पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली होती. मात्र, या प्रकरणात अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश आयोगाने पोलिसांना दिले. त्यानंतर याप्रकरणी कलम वाढवून ॲट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला.
पंधरा वर्षीय मुलीने ३० डिसेंबर २०२३ मध्ये राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत मृत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार वाकड पोलिसांनी अजित गुलाब गवारे (रा. मोई, ता. खेड), जांबाज दाऊद पिंजारी (रा. फेमस चौक, समर्थ नगर, नवी सांगवी), प्रदीप शिंदे, सतीश सोनवणे व ज्ञानेश्वर गजानन बोरडे, विष्णू पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. नंतर ते जामीनावर बाहेर आले. तर विकी पेरणेकर फरार आहे. दरम्यान, याप्रकरणी अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ‘एआयएमआयएम’चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क आयोगाकडे केली होती. दरम्यान, तपासाअंती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कलमवाढ करून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हाही दाखल केला. दरम्यान, याप्रकरणी सखोल तपास करीत आरोपींवर कडक कारवाई करून पीडित मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी दीपक कांबळे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.