शिकाऊ वाहन परवाना कोटा पाच दिवसांवर आणा

शिकाऊ वाहन परवाना कोटा पाच दिवसांवर आणा

Published on

पिंपरी, ता. २ : बोगस ड्रायव्हिंग स्कूल चालकांवर कारवाई करावी, शिकाऊ वाहन परवाना कोटा पाच दिवसांवर आणावा, तांत्रिक अडचणींवर तोडगा काढावा, अशा मागण्या मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी केल्या. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी ही मागणी केली. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
न्यू पिंपरी-चिंचवड ड्रायव्हिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश तट्टू, शंकर घारे, सुनील होले, सचिव अभिजीत शिंदे, खजिनदार राजेंद्र भारंबे, कार्याध्यक्ष बबन मिसाळ, आशिष महाडीक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विविध मागण्यांवर चर्चा करून त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी स्कूल चालकांकडून करण्यात आली.


‘आरटीओ’ परिसरातच बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूल
‘आरटीओ’ परिसरातच बेकायदा ड्रायव्हिंग स्कूल चालू असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. अनेकदा अशा चालकांकडून शुल्क आकारले जाते. परंतु, नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे, त्यांना आरटीओचे हेलपाटे मारावे लागतात. हे लक्षात घेऊन संबंधित दोषी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.

आणखी काय आहेत मागण्या...
- शिकाऊ परवान्याचा कोटा २० दिवसांऐवजी पाच दिवसांवर आणावा.
- अर्जदारांना उत्तीर्ण होऊनही ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना भेटा, असे मेसेज.
- विविध तांत्रिक अडचणी आरटीओ कार्यालयाकडून दूर कराव्यात.
- वाहन चालविण्याची चाचणी आरटीओच्‍या जागेत घ्यावी.
- पुन्हा संबंधित अर्जदाराला पुन्हा शुल्क अथवा अर्ज करायला लावू नये.
- अर्जदारांची कामे विनाअडथळा व्हावीत, तशा सूचना कर्मचारी, अधिकाऱ्यांना द्याव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.