विद्युत सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता

विद्युत सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता

Published on

पिंपरी, ता. १ ः विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिका आणि विद्युत निरीक्षण विभागातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विद्युत सुरक्षितता विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात विद्युत सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असा संकल्प करण्यात आला.
महापालिकेचे सहशहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, विद्युत निरीक्षण विभागाचे शाखा अभियंता महेंद्र जगताप, सहाय्यक विद्युत निरीक्षक नीलेश मुळूक, अभिजित शिंदे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, अनुश्री कुंभार, समीर दळवी, माणिक चव्हाण, महेश कावळे, वासुदेव मांढरे, सचिन नांगरे, दिलीप धुमाळ, बाळू लांडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील विद्युत विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, वीज पर्यवेक्षक, वायरमन, इलेक्ट्रिकल कंत्राटदार उपस्थित होते.
विद्युत अपघात होऊ नये यासाठी आणि अपघात झाल्यास परिस्थिती हाताळताना घ्यायची काळजी, विद्युत अधिनियमांतील अधिसूचनांबाबत मार्गदर्शन केले. पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना, आपत्कालीन परिस्थितीत करायच्या उपाययोजना, नवीन प्रकल्प उभारताना विद्युत विषयक कामांचा दर्जा उंचावणे, देखभाल करणे, विद्युत संच मांडणी करणे, निवासी व औद्योगिक भागांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करताना विद्युत सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवणे, या सूत्रांवर आधारित सुविधा निर्माण करणे आणि वीज विषयक नियम न पाळल्यास होणारी कारवाई याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कनिष्ठ अभियंता दीपाली धेडे यांनी सूत्रसंचालन केले; तर सह शहर अभियंता संजय खाबडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.