शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पिंपरी, ता. ३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या शहरातील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यात एकूण २३ मागासवर्गीय मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये १३ मुलांची व १० मुलींची वसतिगृहे आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण ११ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींची चार व मुलांची सात वसतिगृहे आहेत. तसेच ग्रामीण भागांत १२ वसतिगृहे आहेत.
शैक्षणिक संस्था स्तरावर २०२४-२५ वर्षाकरिता विद्यार्थ्यांची प्रवेशाची कार्यवाही सुरू झालेली आहे. समाज कल्याण विभागाने मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची प्रवेशाची अंतिम मुदत पाच जुलैपर्यंत आहे. इयत्ता दहावी व अकरावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी ३१ जुलैपर्यंत आहे. पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची मुदत पाच ऑगस्ट आहे.
बी.ए., बी.कॉम. व बीएस्सी अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए., एम.कॉम. व एमएससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका आदी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी ३१ जुलैपर्यंत असून पहिली निवड यादी अंतिम व प्रसिद्ध करावयाची मुदत पाच ऑगस्ट आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
पुण्यातील मुलांच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जाचे वितरण व स्वीकृती संत ज्ञानेश्‍वर मुलांचे शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी, पुणे-६ व मुलींच्या शासकीय वसतिगृहामधील अर्जाचे वितरण व अर्जाचे स्वीकृती संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, पुणे कॉमरझोन आय. टी. पार्कशेजारी, येरवडा येथे करण्यात येईल. उर्वरित जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर, खडकवासला व तालुका पातळीवरील अर्जाचे वितरण व स्वीकृती त्याच वसतिगृहात करण्यात येईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com