गुन्‍हे वृत्‍त

गुन्‍हे वृत्‍त

जबरी चोरी प्रकरणी एकास अटक
पिंपरी : कोयत्याच्या धाकाने हॉटेलमधील गल्ला लुटणाऱ्या एक जणास पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (ता.१) सायंकाळी पाचच्या सुमारास चऱ्होली येथे घडली. साहिल रामदास दाभाडे (२८, रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश काळुराम दाभाडे (३०, रा. दत्त मंदिराजवळ, चऱ्होली) यांनी मंगळवारी (ता.३) याबाबत दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नफ्याच्या अमिषाने महिलेची फसवणूक
पिंपरी : कमी वेळेत जादा नफा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची दोन लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ मे ते २८ मे या कालावधीत कासारवाडी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सॅम्युयल फॅन्कलिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने गंडा
पिंपरी : क्रिप्टो करन्सीच्या बहाण्याने एका तरुणाची ५० लाख ३८ हजार १८ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ एप्रिल २०२४ ते २७ जून २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. सागर भास्कर गायकवाड (४४, रा. विशालदीप अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी राजदीप शर्मा, निशा सन्याल, झिप्टो ऑनलाइन सर्व्हिस आणि चोले कायला या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडीत पावणेआठ लाखांची फसवणूक
पिंपरी : धनादेशावर खाडाखोड करत एकाची सात लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २३ मे २०२४ आणि २०२० या कालावधीत घडली. कियत जयप्रकाश नायर (६०, रा. ब्ल्यू रिज सोसायटी, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोविंद बळिराम कांबळे (रा. उमरगा, उस्मानाबाद), हंसराज भीम काळे (पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

खरेदीच्या बहाण्याने पैसे उकळले
पिंपरी : आयपीओ खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीकडून पैसे घेत त्यांना कोणताही नफा न देता त्यांची ६६ लाख ४० हजारांची फसवणूक केली. ही घटना १० ते २१ जून या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. कृतिका चौहान, अपेक्स इंटरप्रायजेस, अजत्वा एम्पायर एलएलपी, एम.एस. कोहिल ऑटो, श्री शाम ट्रेडर्स कंपनी, नवज्योत ट्रेडर्स आणि दोन अनोळखी मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील ४३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.


फुकट दारूसाठी मागितली खंडणी
पिंपरी : एका दारू दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवत दरमहा एक हजार रुपये आणि लागेल तेवढी फुकट दारू देण्याची खंडणी मागितल्याची घटना सोमवारी (ता.१) दुपारी लिंकरोड, पिंपरी येथे घडली. दाद्या कांबळे (२५, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक ओमप्रकाश तलरेजा (३५, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भागीदाराच्या नावे परस्पर कर्ज
पिंपरी : भागीदारीत असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने भागीदाराच्या नावावर एक कोटी ५५ लाखांचे कर्ज काढून परस्पर जमिनी खरेदी केली. मात्र, त्या जमिनीवर भागीदाराच्या परिवाराचे नाव लावले नाही. ही घटना २५ ऑक्टोबर २०२२ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.
सुदर्शन गणपत बालवडकर आणि त्याची पत्नी (दोघेही रा. सेलिब्रेशन अपार्टमेंट, बालेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संजय काळुराम दळवी (३७, रा. सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोटारच्या धडकेत एक ठार; एक जखमी
पिंपरी : भरधाव मोटारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
तर सहप्रवासी जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता.२) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडला. सुरेंद्रकुमार राम अकबल (रा. एमआयडीसी भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. सहप्रवासी कपिल पटेल हा जखमी झाला आहे. या प्रकरणी राजेंद्र राम अकबल (वय २६) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पिंपरी : भरधाव टँकरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ३० जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पूना गेट हॉटेल समोर, निगडी येथे घडली. सुधांशू दयाशंकर मिश्रा (२४, रा. रुपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी राजेश कालीप्रसाद तिवारी (५५, रा. पिंपरी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सतीश रामसेवक सिंग (४५, रा. ठाणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com