प्रलंबित मागण्यांसाठी
शिक्षक संघटना आक्रमक

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक

Published on

सोमाटणे, ता. ४ ः माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा टीडीएफच्या वतीने देण्यात आला आहे. वारंवार मागण्या करूनही गेल्या दोन दशकांपासून माध्यामिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता अद्याप केलेली नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करावी. मुख्याध्यापक पद पूर्वीप्रमाणे शंभर विद्यार्थ्यांमागे होते ते मान्य करावे. २००५ नंतरच्या शिक्षकांनाही जुनी पेंशन योजना लागू करावी. विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे. निवडश्रेणीचा लाभ सर्वच शिक्षकांना द्यावा. दरवर्षी वेळेत संच
मान्यता पूर्ण करावी, केंद्राप्रमाणे शिक्षकांनाही वाढीव महागाई भत्ता द्यावा, आदी मागण्यांची तत्काळ पूर्तता करावी, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली. मागण्याची तत्काळ पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, सचिव मुरलीधर मांजरे, कार्याध्यक्ष जी. के. थोरात, सचिन दुर्गाडे, संतोष थोरात, राज मुजावर, संजय कांबळे, शशिकांत शिंदे, भारती राऊत, हर्षा पिसाळ आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.