वडाच्या झाडांनी घेतला मोकळा श्वास

वडाच्या झाडांनी घेतला मोकळा श्वास

Published on

पिंपरी, ता. ४ ः वटपौर्णिमेनिमित्त महिला भगिनींनी वडाच्या झाडांची पूजा केल्यानंतर झाडाच्या खोडाला बांधलेले धागे अनेक दिवस तसेच राहतात. या धाग्यांमुळे झाडांची वाढ खुंटते. तसेच, सुती धाग्यांऐवजी नायलॉन दोरा वापरल्याने झाडांना जखम होते. त्यामुळे मुंगळे, खार व इतर किटक, पक्षी बाधित होतात. तसेच वडाच्या झाडाखाली अस्वच्छता पसरते. वडाच्या झाडाची हानी होऊ नये यासाठी हे धागे काढण्याचा उपक्रम वृक्षमित्र अशोक बिचकुले यांनी हाती घेतला होता. शहरात ज्या ठिकाणी वडाच्या झाडास असे धागे गुंडाळलेले होते ते धागे अवघ्या काही दिवसांतच काढून बिचकुले यांनी अनेक झाडांची हानी होण्यापासून बचाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.