मोटारीच्या धडकेत मुलाचा मृत्‍यू

मोटारीच्या धडकेत मुलाचा मृत्‍यू

Published on

पिंपरी, ता. ४ : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्‍यू झाला. ही घटना चिखलीतील कुदळवाडी येथे घडली. मोटर चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्‍मद अफजल खान (वय १०, रा. मोरे-पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) असे अपघातात मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्‍याचे वडील कमाल अहमद मंजूर अली खान यांनी चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मोटार चालक विक्रम दादाभाऊ कसबे (वय ४१, रा. श्रीराम कॉलनी, चिखली) याला अटक केली आहे. फिर्यादी यांचा मुलगा मोहम्‍मद हा मोरे-पाटील चौक येथील रस्ता ओलांडत होता. त्यावेळी मोटारीची त्याला धडक बसली. तिचे चाक डोक्‍यावरून गेल्‍याने गंभीर जखमी होऊन मोहम्मद याचा मृत्‍यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.