मिळकतकर थकबाकीमुळे 
८८ मिळकतींचा लिलाव
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

मिळकतकर थकबाकीमुळे ८८ मिळकतींचा लिलाव पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

पिंपरी, ता. ४ ः मिळकतकर थकबाकी असलेल्या ८८ मिळकती पिंपरी-चिंचवड महापालिकेने जप्त केल्या आहेत. त्यांचा लिलाव पाच ऑगस्ट रोजी होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह व्यापारी व व्यावसायिकांच्या मालमत्तांचा समावेश आहे.
महापालिकेचा मिळकतकर वर्षानुवर्षे थकीत असलेल्या मिळकतधारकांना गेल्या वर्षी नोटीस बजावल्या होत्या. तरीही प्रतिसाद न दिल्याने मिळकती जप्त केल्या. त्यांचा आता लिलाव केला जाणार आहे. ५० हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत मिळकतकर थकबाकी असलेल्या या मिळकती आहेत. त्यांचे बाजारमूल्य किमान १९ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण आठ (कराधान नियम) नियम ४२ ते ४८ मधील तरतुदींनुसार मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेच्या करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करायची आहे. तसेच, लिलावातील मालमत्तांबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था व इतर यांचे आर्थिक हितसंबंध, हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह तीन ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवायचे आहेत.

इथे होणार लिलाव
महापालिका सहाय्यक आयुक्त (करआकारणी व करसंकलन) यांच्या कार्यालयात (तळमजला, महापालिका मुख्य इमारत, पिंपरी) पाच ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते तीन या वेळेत लिलाव होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com