जैन इंग्लिश स्कूलचे 
शिष्यवृत्तीत नेत्रदीपक यश

जैन इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्तीत नेत्रदीपक यश

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत जैन इंग्लिश स्कूलने यावर्षी नेत्रदीपक यश प्राप्त केले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अशा दोन्हीही गटातून मावळ तालुक्यात देदीप्यमान यश संपादित केले.

मावळ तालुक्यात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पलक पाटील प्रथम तर पुणे जिल्ह्यामध्ये १२०व्या क्रमांकाची मानकरी ठरली. तसेच आरुषी पाटील या विद्यार्थिनीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मावळात तृतीय क्रमांक आणि पुणे जिल्ह्यात ३१२वा क्रमांक संपादित करून यश मिळवले. अनिरुद्ध लकडे हा विद्यार्थी मावळ तालुक्यात चौथ्या क्रमांकावर तर पुणे जिल्ह्यात ३७९ क्रमांक मिळवून यशस्वी झाला.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वर्धन शिंदे याने मावळ तालुक्यात द्वितीय क्रमांक तर पुणे जिल्ह्यात २८५वा क्रमांक मिळवून यश संपादित केले. मृण्मयी कदम या विद्यार्थिनीने मावळ तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २९२वा क्रमांक पटकावला. अनन्या बोडके ही विद्यार्थिनी मावळ तालुक्यात चतुर्थ तर जिल्ह्यात २९३व्या क्रमांकाची मानकरी ठरली. दुर्वेश चव्हाण याने मावळ तालुक्यात पाचव्या क्रमांकाचे तसेच जिल्हास्तरावर ३१२वा क्रमांक प्राप्त करून यश मिळवले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका विजया शिंदे आणि विपुल भुसारे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक यांनी अभिनंदन केले.

PNE24U30399, PNE24U30400, PNE24U30401, PNE24U30403, PNE24U30404, PNE24U30405, PNE24U30406

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.