प्रदेश आढावा बैठकीला 
पिंपरीतून एकच जण हजर
‘राष्ट्रवादी’च्या शहराध्यक्षांसह १५ पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

प्रदेश आढावा बैठकीला पिंपरीतून एकच जण हजर ‘राष्ट्रवादी’च्या शहराध्यक्षांसह १५ पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

Published on

पिंपरी, ता. ४ : प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी (ता. ४) बोलाविलेल्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला पिंपरी चिंचवडमधून १६ प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी एकच कार्याध्यक्ष हजर होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी राज्यातील सर्व शहर-जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व विभागांचे अध्यक्ष यांची आढावा बैठक मुंबईत बोलविली होती. या बैठकीला शहरातून फक्त कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे हे एकटेच हजर होते, असे विश्‍वसनीय वृत्त आहे. या बैठकीत शहराध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष व प्रमुख विभागांचे ११ अध्यक्ष असे किमान १६ जण हजर राहणे अपेक्षित होते. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विविध ४२ विभाग आहेत. मुंबईला बैठक असल्यामुळे सर्वच जण सहभागी होऊ शकत नाहीत, असे गृहीत धरले तरी किमान प्रमुख ११ विभागांचे अध्यक्ष, शहराध्यक्ष व पाच कार्याध्यक्ष, असे मिळून १६ जण तरी सहभागी होणे अपेक्षित होते.
लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षातून पदाधिकारी प्रवेश करण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी नुकतीच भेट घेतली होती. दररोज काही पदाधिकारी पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. असे वातावरण असताना मुंबईतील बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी अनेकांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.