हिंजवडीतील विबग्योर स्कूलची
ज्ञानस्त्रोत केंद्रास भेट

हिंजवडीतील विबग्योर स्कूलची ज्ञानस्त्रोत केंद्रास भेट

Published on

पिंपरी, ता. ६ ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील ज्ञानस्त्रोत केंद्रातील ग्रंथालयामध्ये पन्नास हजारापेक्षा अधिक पुस्तके, विविध भाषेतील वर्तमानपत्रे, जर्नल्स, नियतकालिके उपलब्ध आहेत. नूतनीकरण झालेल्या सुसज्ज अशा या ग्रंथालयामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांच्याकरिता तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डिजिटल ग्रंथालय विभाग, स्वतंत्र संदर्भ पुस्तक विभाग, जर्नल्स व नियतकालिक विभाग, वर्तमानपत्र विभाग, स्वतंत्र वाचन कक्ष, डिजिटल ग्रंथालय विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपलब्ध आहेत. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम ग्रंथालय विभाग राबवीत असते.

त्याचाच एक भाग म्हणून चिमुकल्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, ग्रंथालयाबद्दल अधिक माहिती व्हावी म्हणून हिंजवडी येथील विबग्योर स्कूलने ज्ञानस्त्रोत केंद्रास (ग्रंथालयास) भेट दिली. सर्व प्रकारचे ग्रंथ या मुलांनी अगदी स्वच्छंदपणे हाताळले. आलेल्या चिमुकल्यांचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप यांनी स्वागत करून ग्रंथालय भेटीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालय व वाचनाचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे ग्रंथपाल डॉ. व्ही. ए. नाईकवाडी यांनी चिमुकल्यांना सांगितले. ग्रंथालयाच्या विविध विभागात काम करणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयातील विविध सुविधांची माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.