वाकडमध्ये कॅब अडवून दगडफेक
तरुणी जखमी ः टोळक्याकडून पाच वाहनांची तोडफोड

वाकडमध्ये कॅब अडवून दगडफेक तरुणी जखमी ः टोळक्याकडून पाच वाहनांची तोडफोड

Published on

पिंपरी, ता. ५ : रस्त्यात कॅब अडवून दगडफेक केल्याने कॅबच्या काचा फुटल्या. यामुळे कॅबमधील तरुणी जखमी झाली. त्यानंतर टोळक्याने आरडाओरडा करून, दहशत माजवली. हातात दगड घेऊन कॅबचालक व दुसऱ्या एका तरुणीचा आरोपींनी पाठलाग केला. त्यानंतर पुन्हा परिसरातील चार वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी येथील डांगे चौक ते दत्त मंदिर रस्ता या दरम्यान घडला.
याप्रकरणी कॅब चालक मयूर तानाजी चव्हाण (रा. वारजे माळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यश बाळू शिंदे (वय २०, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड), साहिल युनूस शेख (वय २१, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी हे गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांच्या कॅबमधून दोन तरुणींना घरी सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, एक तरुणीला सोडण्यासाठी फिर्यादी हे म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात थांबले असता, एका आरोपीने दगडाने कॅबची काच फोडली. तसेच कॅबमध्ये बसलेल्या दुसऱ्या प्रवासी तरुणीच्या हाताला पकडून त्यांना बाहेर ओढू लागला. दरम्यान, तरुणीने प्रतिकार केला असता, आरोपीने त्यांच्या हातावर दगड मारला तसेच गाडीची काचही त्यांना लागल्याने तरुणी जखमी झाली. त्यानंतर दोघांनी कॅबवर दगड मारत काच फोडून फिर्यादीच्या खिशातील दोन हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.
दरम्यान, प्रवासी तरुणी कॅबमधून उतरून घराकडे जाण्यासाठी निघाली असता, आरोपींनी संबंधित तरुणी व गार्ड यांना पाहून आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. दगड घेऊन त्यांच्या पाठीमागे लागले. ते घाबरून पळून गेले असता आरोपींनी परिसरातील तीन रिक्षा व मोटारीवर दगडफेक करून नुकसान केले. तसेच फिर्यादी हे त्यांच्या कॅबमधून तेथून जात असताना पुन्हा कॅबवर पाठीमागून दगड मारले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.