चऱ्होलीत दोन गटांत वाद

चऱ्होलीत दोन गटांत वाद

Published on

पिंपरी, ता. ६ : हराळे वैष्णव समाज धर्मशाळेचे अध्यक्ष व इतर व्यवहारांवरून दोन गटांत वाद झाला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. चऱ्होली बु. येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (चऱ्होली फाटा) येथे हा प्रकार घडला.
बबन विठोबा पटेकर (रा. पटेकर आळी, इंद्रायणीनगर, चऱ्होली. बु) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाबा कांबळे, नदीम शेख, भारती चव्हाण, मधुरा डांगे, आशा कांबळे व एक अनोळखी मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ करून हाताने व दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले.
तर मधुरा मोहन डांगे (रा. हरगुडे वस्ती, घरकुल, चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बबन विठोबा पटेकर (वय ६७), सोपान गवळी, त्यांची पत्नी, महेश पटेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा रस्ता अडवून शिवीगाळ करून हाताने व दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.