कासारसाई धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

कासारसाई धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

Published on

सोमाटणे, ता. ७ ः कासारसाई धरणाच्या पाणीसाठ्यात आज (ता. ७) पहाटे पडलेल्या जोरदार पावसाने एक टक्क्यांनी वाढ झाली. गेले आठ दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. कासारसाई धरण परिसरात गेल्या बारा तासात १७ मिमी तर एकूण २१७ मिमी पाऊस पडला. यामुळे भात खाचरे तुडुंब भरल्याने शेतातील व डोंगरमाथ्यावरील पाणी वाहू लागल्याने कासारसाई नदीला पूर आला होता. यामुळे धरणातील पाणी साठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा ४.२७ दशलक्ष घनमीटर तर एकूण पाणीसाठा ५.५९ दशलक्ष घनमीटर झाला असून धरणात २६.६२ टक्के पाणीसाठा आहे. भात खाचरे पूर्ण क्षमतेने भरल्याने पवनमावळात भात लावणीला वेग आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.