कर्ज फेडण्यासाठी अडीच कोटींचा गंडा

कर्ज फेडण्यासाठी अडीच कोटींचा गंडा

पिंपरी, ता. ७ : व्यवसायात झालेले कर्ज फेडण्यासाठी एकाने दिघी येथील नागरिकाला अडीच कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने गुजरातमधून एकाला जेरबंद केले आहे.
निकुंज अश्विनभाई मकवाना (रा. सुरत, गुजरात) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. दिघी येथील फिर्यादीला आरोपीने एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेत, त्यांना शेअर मार्केटसंदर्भात टिप्स देऊ लागला होता. या ग्रुपमध्ये जे इतर व्यक्ती होते, त्यांना रोजच्या रोज नफा होत असल्याचे फोटो या ग्रुपवर पाठवीत होता. त्यामुळे फिर्यादी यांनाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ग्रुप ॲडमिन व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे बँक अकाउंट देवून, त्यावर दोन कोटी ४५ लाख ३० हजार घेतले. त्यानंतर फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबतचा गुन्हा दिघी पोलिस ठाण्यात दाखल झाला.
या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल करीत असताना संबंधित बँक अकाउंट हे सुरत येथील असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस तिथे गेले. तेथे आरोपींचा शोध घेऊन श्री राधे एन्टरप्रायजेस या नावाने अकाउंट असलेला अकाउंटधारक मकवाना याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हा गुन्हा त्याने व्यवसायात झालेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी केला असल्याची कबुली दिली. हा गुन्हा आरोपीने त्याच्या परदेशातील व बाहेर राज्यातील साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चार कोटींची उलाढाल
आरोपीने वापरलेल्या बँक अकाऊंट विरुद्ध देशभरातून एकूण ५६ तक्रारी प्राप्त झालेल्या असून, या अकाउंटला चार कोटी २९ लाख ४९ हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com