पोलिसांच्या घरांचा प्रश्न 
शासन दरबारी प्रलंबित 
औंधमधील जागेच्या बदल्यात पीएमआरडीए घरे कधी बांधणार?

पोलिसांच्या घरांचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित औंधमधील जागेच्या बदल्यात पीएमआरडीए घरे कधी बांधणार?

पिंपरी, ता. ७ : पीएमआरडीएने मेट्रोसाठी औंधमधील चव्हाणनगर येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्‍या जागेच्‍या बदल्‍यात पोलिसांना घरे बांधून दिले जातील, असे सांगितले होते. त्‍या जागेसाठीचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्‍याबाबत पुढील आदेश प्राप्‍त न झाल्‍याने हा निर्णय प्रलंबितच राहिला आहे. त्‍या बाबत कार्यवाही कधी होणार असा प्रश्‍न आहे.

‘पीएमआरडीए’कडून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ला पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय, ‘पॉलिटेक्निक कॉलेज’तसेच वाकडेवाडी येथील डेअरीची जागा मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्‍ताव पाठविण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली जागा ‘पीएमआरडीए’च्या हातात आल्याने त्यांच्या मागणीनुसार ‘पीएमआरडीए’कडून पोलिसांना घरे उभारून देणार आहे. सध्या या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांसाठी घरे आहेत. मात्र, ती मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे मुख्यालय आणि बावधन येथील पोलिसांच्या जागेत ही घरे उभारून देण्याचे प्रस्‍तावित होते. मुख्यालयाच्या जागेसंदर्भात काही परवानगी मिळवणे बाकी आहे. परवानगी मिळाल्यानंतर लगेचच घरांच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. मात्र, शासनाच्‍या लालफिती कारभारात ही प्रक्रिया अडकून पडली आहे.

‘‘औंधमधील जागेच्‍या बदल्‍यात पोलिसांना घरे बांधून देण्यात येणार आहेत. त्‍या बाबतचा प्रस्‍ताव शासनाकडे दिला आहे. त्‍यांच्‍याकडून आदेश प्राप्‍तीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ‘पीएमआरडीए’ची देखील काही जागा पोलिस प्रशासनाला दिली आहे.
- हिंमत खराडे, उपायुक्त, जमीन क मालमत्ता विभाग, पीएमआरडीए.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com