तीन गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई

तीन गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई

Published on

पिंपरी, ता. ७ : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली.
सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात टोळीप्रमुख सौरभ ऊर्फ राजकुमार गोकूळ घुटे (वय २३, रा. जयमालानगर, जुनी सांगवी), सुजल राजेंद्र गिल (वय १९), अमन राजेंद्र गिल (वय १८, दोघेही रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव), अब्दुल अजीज ऊर्फ पापा अलीम अख्तर आगा (वय २४, रा. जयमालानगर, जुनी सांगवी), जितेश ऊर्फ मुन्ना रवींद्र जगताप (वय ३०, रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव), अजय ऊर्फ बारक्या यशवंत सावंत (वय २४, रा. शेळकेवाडी, घोटावडे, ता. मुळशी), मयूर नितीन अवचरे (वय २६, रा. पीडब्ल्यूडी कॉलनी, पिंपळे गुरव), अक्षय रामदास टेकाळे (वय २०), अविनाश पातीराज डिमेंटी (वय ३१, दोघेही रा. गांगर्डेनगर, पिंपळे गुरव) यांच्यावर एकूण वीस गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.
देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळीप्रमुख आदर्श ऊर्फ छोट्या अशोक मगर (वय २५, रा. राहुलनगर, ओटास्कीम, निगडी), अनुराग संतोष विधाते (वय १९, रा. सद्गुरू कृपा सोसायटी, जुना जकात नाका, चिंचवड), आदित्य गोरख दुनघव (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी), कृष्णा ऊर्फ बाळा झुंबर पुलावळे (वय २४, रा. त्रिवेणीनगर चौक, निगडी), प्रणव ऊर्फ पन्या गौराण्णा अर्जुन (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी), अमित संतोष नाईक (वय २४, रा. काळभोर चाळ, निगडी), तुषार अनिल चव्हाण (वय १९), झाकिर कय्यूम पठाण (वय २३), जेसन जॉन डिकोना (वय २७), रफिक सलीम खान (वय ३६), आनंद ऊर्फ दाद्या राजू गवळी (वय २१, सर्व रा.ओटास्कीम, निगडी), गणेश ऊर्फ संदीप बाळासाहेब मतकर (वय २३, रा. रुपीनगर, तळवडे), सूरज कैलास उराव (वय १९), सागर रामदास जाधव (वय २४, दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) व एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर २६ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.

तसेच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना टोळीप्रमुख विकी ऊर्फ विवेक राजेश खराडे (वय १९, रा. कामाठीपुरा, शिक्रापूर), नीरज बापू पवार (वय १८, रा. नेहरूनगर, पिंपरी), आदित्य नितीन भोईनल्लू (वय २०, रा. कामाठीपुरा, शिक्रापूर), रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय १८, रा. कातवी रोड, तळेगाव दाभाडे), आर्यन विनोद पवार (वय १९, रा. बावधन), ओम संदीप घाटे (वय २१, रा. वडगाव शेरी), पांडुरंग बालाजी कांबळे (वय २३, रा. शिरूर) व एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर आठ गुन्हे दाखल असल्याचे आढळले.
या टोळीतील आरोपींनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, तोडफोड करणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ‘मोका’ कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या वर्षात अद्यापपर्यंत २१ टोळ्यांतील १३० आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
----------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.