आषाढी वारीनिमित्त शनिवारपासून कीर्तन महोत्सव
‘सकाळ’तर्फे चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन

आषाढी वारीनिमित्त शनिवारपासून कीर्तन महोत्सव ‘सकाळ’तर्फे चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन

Published on

पिंपरी, ता. ८ ः नोकरी, व्यवसाय वा कामधंद्यानिमित्त काही तात्कालिक अडचणींमुळे अनेकांना पंढरपूरच्या आषाढी वारीत जाणे शक्य होत नाही. पांडुरंगाच्या दर्शनाची आणि भजन-कीर्तनात रंगून कायिक- वाचिक सेवेची आस त्यांच्या मनात असते. त्यांच्यासाठीच ‘सकाळ’ने शनिवारपासून (ता. १३) चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यात सहभागी वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची आस आहे. या पायी वारीची वाटचाल अठरा दिवसांची आहे. यात कायिक, वाचिक सेवेसाठी अनेक जण चालत आहेत. त्यात ‘आपणही जावे’, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, दैनंदिन कामाचा व्याप व अन्य कामांमुळे वारीत जाणे शक्य होत नाही. पांडुरंगाच्या सेवेची, त्यांच्या नामस्मरणाची आस सर्वांना असते. त्यांच्यासाठीच आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते कीर्तन महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा होईल. बुधवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होईल.

कीर्तनांची वेळ आणि कीर्तनकार
शनिवार, ता. १३ ः सायंकाळी ५ ः नागपूर येथील ज्येष्ठ कीर्तनकार तथा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक
रविवार, ता. १४ ः सायंकाळी ५ ः पैठण येथील कीर्तनकार आणि संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी
सोमवार, ता. १५ ः सायंकाळी ५ ः पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे
मंगळवार, ता. १६ ः सायंकाळी ५ ः आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील
बुधवार, ता. १७ ः सकाळी १० ः आळंदी येथील कीर्तनकार चिंदबरेश्‍वर महाराज साखरे

काय? कुठे? कधी? केव्हा? कसे?
काय? ः ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह
कधी? ः १३ ते १७ जुलै २०२४
केव्हा? ः १३ ते १६ जुलै सायंकाळी ५. १७ जुलै सकाळी १०
कसे? ः प्रवेश विनामूल्य

अधिक माहितीसाठी संपर्क
शिवम ः ९३०७७१५९०३, अक्षय ः ९५६१३१४६७९
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.