शिष्यवृत्ती यश मिळवले

शिष्यवृत्ती यश मिळवले

पिंपरी, ता.९ ः राज्य परीक्षा परिषदे मार्फत १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये, शहरातील विविध महापालिका आणि खासगी शाळांनी यश मिळवले आहे.
चिंचवड स्टेशन येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती निकाल उत्कृष्ट लागला. इयत्ता पाचवीचा एक व इयत्ता आठवीचे सहा असे एकूण सात गुणवंत विद्यार्थी यशस्वी झाले. इयत्ता पाचवी धैर्यशील खैरे (२४६), इयत्ता आठवीचे वैष्णवी जाधव (२४८), सूरज केदार (२१२), संयुक्ता कदम (२१०), सिद्धी घुले (२०४), संकल्प खैरे (१९६), श्रेया बोरावके (१९४) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, मुख्याध्यापक साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रेय भालेराव यांनी अभिनंदन केले.

प्रेरणा प्राथमिक शाळा
निगडीच्या प्रेरणा प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आरोही मयूर झगडे जिल्हा गुणवता यादीत ३०० पैकी २४० गुण मिळवून १७९ वी आली. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी तिचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव, शिक्षक स्वाती ताम्हनकर, मंजिरी ब्रह्मे, विलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.


एच.ए. प्रशाला
इयत्ता पाचवीच्या (इंग्रजी माध्यम) प्रीत पाटील याने २९४ पैकी २७२ गुण प्राप्त करून राज्यस्तरीय शहरी गुणवत्ता यादीत दहावे स्थान प्राप्त केले आहे. तसेच पुणे जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तर इंग्रजी माध्यमातून पुणे विभागातून प्रथम क्रमांक त्याने पटकावला आहे.
तसेच इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मिसबा शेख हिने २२४ गुण प्राप्त करून शहरी विभाग गुणवत्ता यादीत ३१३ वा क्रमांक मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे एकूण ३३ विद्यार्थी पात्र ठरले. तर इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण २८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापक दत्तात्रेय भोसले, पर्यवेक्षिका मनीषा कदम, शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सरस्वती माध्यमिक विद्यालय
आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील समृद्धी भगत हिने इयत्ता आठवीच्या परीक्षेत ३०० पैकी २१४ गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत ४१६ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर प्रज्ञा ओव्हाळ ही विद्यार्थिनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या एनएमएमएसच्या परीक्षेत १८० पैकी १०७ गुण मिळवून पुणे जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत ५७ क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शिष्यवृत्तीसाठी या दोघींची निवड झाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यालयाचे ३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याबद्दल, नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. गोविंद दाभाडे, विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सुरेखा वाळुंज, उपप्राचार्य विजय बच्चे यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

रामचंद्र गायकवाड विद्यालय
दिघी येथील रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी (इयत्ता पाचवी) गौरी आवटे (२५०), दुर्वा निकम (२४४), रोशन चव्हाण (२४०), रोशन शिरसाट (२२६), यज्ञेश जाधव (२२०), उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी (इयत्ता आठवी) वरद पोद्दार (२६०), शिवम खाडे (२४६), वीरेंद्र पाटील (२२८), सोहम राऊत (२१४), सिमरन शेख (२०६), ओंकार जानापुरे (२००) यांनी यश मिळवले. संस्थापक दत्तात्रेय गायकवाड, अध्यक्ष विनायक वाळके, सचिव रवींद्र गायकवाड, उदय गायकवाड, धनश्री गायकवाड, अश्विनी गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद वाळके, पर्यवेक्षिका मंगल भोसले यांनी अभिनंदन केले.

पब्लिक स्कूल कन्या शाळा, दिघी
पिंपरी-चिंचवड मनपा पब्लिक स्कूल कन्या शाळा, दिघी पुणे या शाळेने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले. १२
विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाले. सृष्टी केरकट्टा ही गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. सृष्टी केरकट्टा ही जिल्ह्यात २१ वी व राज्यात २६ व्या क्रमांकाने अव्वल ठरली आहे. तसेच नवोदय परीक्षेमध्येही इयत्ता पाचवीच्या चार विद्यार्थिनी अ श्रेणीने पास झाल्या आहेत. इयत्ता पाचवीच्या वर्ग शिक्षिका वनिता नेहे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सुनंदा शिंदे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर
इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये इयत्ता आठवी मधील आर्या गाडेकर ३०० पैकी २२६ गुण, अभिमन्यू राठोड २१० गुण, भक्ती कोठावळे १९६, सानिका खुटाळ १९२ हे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आली आहेत. तसेच आर्य गाडेकर याला इंग्रजी विषयात ५० पैकी ५० गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता पाचवीमधील शिष्यवृत्ती परीक्षा करता बसलेले विद्यार्थ्यांमध्ये आर्यन सोनवणे ३०० पैकी २४४ गुण आयुष मेहेर २३६ गुण, आराध्या धुपे २२० गुण हे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. या यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे-पाटील, सूरज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज लांडे-पाटील, उपाध्यक्ष महेश घावटे, सचिव सुरेश फलके, एस.आर.शिंदे यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक हनुमंत आगे, संतोष काळे, उद्धव ढोले, मनीषा गुरव, एस.टी. गुरव, बी.टी. साळुंखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार केले. शिक्षक एस. यु. बनसुडे, श्रीकृष्ण भालेराव, एस.डी. कुंभार, किसन घाडगे, बी. के. असवले, बी.ए. गायकवाड, पी.एस. पाखरे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com