पोलिस आयुक्तालयाला जाधववाडीत जागा

पोलिस आयुक्तालयाला जाधववाडीत जागा

पिंपरी, ता. १० : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उभारण्यासाठी जाधववाडी-चिखली येथील गट क्रमांक ५३९ मधील ३ हेक्‍टर ३९ आर ही शासकीय जमीन पोलिस आयुक्तालय, निवासस्थान आणि परेड ग्राउंड प्रयोजनाकरिता प्रदान करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने मान्यता दिली. त्‍यामुळे, पोलिस आयुक्‍तालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्‍याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पोलिस आयुक्तालय, चिखली पोलिस ठाण्यासाठी जागा व दापोडी पोलिस ठाण्याची निर्मिती याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संबंधित विषय मार्गी लावण्याबाबत आग्रही मागणी केली होती. त्‍यानुसार पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे सदर शासकीय जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करील. तसेच जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक राहील, अशा अटींवर या जागेला मान्यता देण्यात आली असल्‍याचे लांडगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com