रेबीजमुक्तीसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना

रेबीजमुक्तीसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना

Published on

पिंपरी, ता. १० ः राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातर्फे रेबीज निर्मूलन कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने शहराला रेबीजमुक्त करण्यासाठी महापालिकेने रेबीज विरोधी पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये पशुवैद्य, पशुधन पर्यवेक्षक, श्वान पकडणारे आणि मदतनीस यांचा समावेश आहे. या पथकाला विशेष डॉग व्हॅन आणि कामकाजासाठी वैद्यकीय वाहन देण्यात आले आहे.
महापालिकेच्या रेबीज विरोधी पथकाने आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त श्वानांचे लसीकरण केले आहे. कुत्रा चावण्याच्या घटना घडलेल्या परिसरांवर लक्ष केंद्रित केले आहे. कॅनाइन कंट्रोल ॲन्ड केअर संस्थेच्या मदतीने नसबंदी केंद्रात सुमारे सहाशे श्वानांचे अँटी-रेबीज लसीकरण केले आहे. तसेच रेबीजला शहरातून हद्दपार करण्यासाठी श्वानांची एकाचवेळी नसबंदी आणि लसीकरणावर भर दिला आहे. गरज पडल्यास येत्या काही दिवसांत रेबीज विरोधी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे.

पथकाचे मुख्य उद्दिष्ट
- कुत्रा चावलेल्या परिसरांवर लक्ष केंद्रित करणे
- ७० टक्के कळप प्रतिकार शक्ती (हार्ड इम्युनिटी) निर्माण करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.