गहुंजे पुलाचे काम अंतिम टप्प्यात

गहुंजे पुलाचे काम अंतिम टप्प्यात

Published on

सोमाटणे, ता. ११ ः गेल्या ४९ वर्षांच्या मागणीनंतर अखेर गहुंजे पुलाचे काम मार्गी लागले असून, सध्या पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
पवना धरणाचे काम १९७५ला पूर्ण झाल्यानंतर धरणात पाणी साठवणे सुरू करण्यात आल्यानंतर धरणाखालील गावातील शेतीसाठी बंधारा व दळणवळणासाठी त्यावरून रस्ता या दुहेरी उद्देशाने पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या ब्राम्हणोली, कोथुर्णे, शिवली, कडधे, थुगाव, बेबडओहोळ, गोडुंब्रे आदी गावातील साकव पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु साळुंब्रे-गहुंजे गाव जोडणाऱ्या पुलाकडे दुर्लक्ष केले गेले. तेव्हापासून गेली ४९ वर्ष पावसाळ्यातील चार महिने पूर्वीचा साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली जाऊन साळुंब्रे-गहुंजे मार्गावरील दळणवळण सेवा बंद पडत होती. ही अडचण सोडवण्यासाठी साळुंब्रे पुलाचे काम करावे, अशी मागणी नागरिक करीत होते.

अखेर नागरिकांच्या या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने यश आले व पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. नदीपात्रात या पुलाची लांबी ७२ मीटर व रुंदी साडेसात मीटर असून या पुलाच्या कामासाठी पिंपरी
-चिंचवड महापालिकेने दहा कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने पुलाच्या कामाला मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. सध्या पुलाचे आधारस्तंभ व स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, आज अखेरचा स्लॅब टाकण्यात आला. त्यामुळे आता केवळ कठडे बांधण्याचे काम अपूर्ण आहे. ते एक महिन्यात पूर्ण होणार आहे. आजअखेर पुलाचे सरासरी ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन पुलावरून ये-जा करणे शक्य होणार आहे.

‘‘शेतीच्या पाण्यासाठी बंधारा व त्यावर रस्ता असा दुहेरी उद्देशाचा हा पूल असल्याने कमी वेळेत पुलाचे काम पूर्ण करणे हे आमच्यापुढे मोठे आव्हान होते. त्यात पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने काम करणे शक्य झाले.’’
- अशोक शेटे, अभियंता, पवना पाटबंधारे विभाग

‘‘४९ वर्षाच्या मागणीला आज यश आले असून, पुलाचे काम मार्गी लागल्याने पवनमावळ पूर्व भागातील गावांना पुणे, पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला.’’
- संतोष राक्षे, साळुंब्रे

PNE24U31591

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.