गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

काळेवाडीत वाहनांची तोडफोड

पिंपरी : वाहनांची तोडफोड करत तरुणाकडील रोकड लुटल्याची घटना काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील श्री गणेश कॉलनी येथे घडली.
अंशु जॉर्ज किपलिंगकर (वय २३), आर्यन रमन पवार (वय १९, दोघेही रा. काळेवाडी) आणि करण रवी पटेकर (वय २५) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सतीश रामकेवल यादव (रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी ‘तुम्ही गाडीच्या काचा का फोडत आहात’, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी करण पटेकर याने फिर्यादी यांची कॉलर पकडून म्हणाला की, ‘तू मला ओळखत नाही का, मला करण पटेकर म्हणतात. याला पकडा रे’, असे त्याच्या साथीदारांना सांगितले. आरोपी अंशु व आर्यन यांनी पकडल्यावर आरोपी करण याने फिर्यादी यांच्या खिशात हात घालून साडेसहाशे रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर, फिर्यादी आणि इतर लोकांच्या वाहनांची तोडफोड केली.


अमली पदार्थाच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
थेरगाव : तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगत चौकशीच्या नावाखाली एका महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना थेरगाव येथे घडली.
या प्रकरणी थेरगाव येथील महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. तुमचे पार्सल मुंबई येथून इराकला जात आहे. त्यामध्ये आठ पासपोर्ट, पाच किलो कपडे, दोन आयपॅड आणि त्यात ३०० ग्रॅम अमली पदार्थ मिळाले आहे. खात्री करण्यासाठी फिर्यादी यांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादी यांना त्यांचे आधारकार्ड दाखवून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर, फिर्यादी यांच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करून त्यांच्या नावावर पाच लाख ६६ हजार ३१२ रुपयांचे कर्ज काढले. त्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून दहा लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले.


कॅफेमध्ये अश्लील चाळे, आणखी एकावर गुन्हा
रावेत : विना परवाना कॅफे चालवून तिथे तरुण-तरुणींना अश्लील चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रावेत येथील नॉकनॉक कॅफे येथे करण्यात आली.
कुणाल पांडुरंग राळे (वय २१, रा. धावडे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. आरोपी याच्याकडे कॅफे चालवण्याचा कोणताही परवाना नसताना तो नॉक-नॉक कॅफे चालवत होता. त्यामध्ये बाहेरच्या बाजूने पडदे लावून आतमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी व अश्लील चाळे, बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com