पिंपरी स्टार्ट अप

पिंपरी स्टार्ट अप

‘स्टार्ट अप’साठी ‘महा-६०’ उपयुक्त

अशोक जॉन यांचे मत; ‘पीसीसीओई’मध्ये कार्यशाळा संपन्न

पिंपरी, ता. ६ ः ‘‘राज्यात उद्योग वाढीस चालना मिळावी व स्टार्टअप्सला मदत व्हावी, या उद्देशाने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने राज्य सरकारने ‘महा-६०’ योजनेला सुरुवात केली आहे. या माध्यमातून निवड झालेल्यांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये दर्जेदार उत्पादन, बाजारपेठेची माहिती संशोधन, नवसंकल्पना, व्यवसाय वाढीस लागणाऱ्या बाबींसाठी मार्गदर्शन केले जाते. या योजनेचा अधिकाधिक नव उद्योजकांनी लाभ घ्यावा,’’ असे आवाहन टॅलेंट इम्पॉवरमेंटचे संचालक अशोक जॉन यांनी केले.
नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग संचालनालयाने राज्यभर ‘महा-६०’ उद्योजकता विकास कार्यशाळा घेतली जात आहे. याअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत जॉन बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापिका वृषाली सोने, संदेश कांबळे, नितीन साळवे, सनक दास, विवेक निर्वाणेश्वर, श्रीजीत नायर, पीसीसीओई प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. शीतलकुमार रवंदळे, बी.व्होक विभागप्रमुख डॉ. उमेश पोतदार आदी उपस्थित होते. आयटी, फार्मसी, ऑटो उद्योजकांना कार्यशाळेचा अधिक लाभ होईल, असे मत सोने यांनी व्यक्त केले. जिल्हा उद्योग केंद्र व पीसीसीओई यांच्यात सामंजस्य करार झाला. प्रास्ताविक डॉ. रजनी पी. के. यांनी केले. आभार प्रा. मुबीन तांबोळी यांनी मानले. ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

महा-६० प्रशिक्षण कार्यक्रमातून व्यवसाय वृद्धीसाठी अनेक तांत्रिक बाबींची माहिती मिळाली. व्यवसायाची योग्य दिशा ठरविण्यासाठी मदत झाली. कर्करोगाचे निदान करण्यासाठी संशोधनाद्वारे तयार केलेल्या प्रकल्पास केंद्र सरकारने मान्यता दिली. या प्रशिक्षणानंतर व्यवसायात मोठी वाढ झाली.
- अरविंदन वासुदेवन, संचालक, ॲक्टोरिअस इनोव्हेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com