आमदार आव्हाड यांचा भाजपकडून निषेध

आमदार आव्हाड यांचा भाजपकडून निषेध

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता.४ : प्रभू श्रीराम यांच्याबाबत अभद्र वक्तव्य केल्याबद्दल शहर भारतीय जनता पक्षातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यांना अटक करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तशा आशयाचे निवेदन पत्र तळेगांव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकरराव आवताडे यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे-पाटील, माजी नगरसेवक संतोष दाभाडे-पाटील, प्रदेश संयोजक सचिन टकले, खजिनदार विनायक भेगडे, संघटनमंत्री रवींद्र साबळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी, रंजनी ठाकूर, माजी नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस निर्मल ओसवाल, उपाध्यक्ष सचिन जाधव, हिम्मत पुरोहित, सागर शर्मा, मृदुला भावे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com