ऐतिहासिक नाट्यसंमेलनाचे
साक्षीदार होण्याचे भाग्य

ऐतिहासिक नाट्यसंमेलनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य

पिंपरी, ता. ६ : चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलात शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे शनिवारी (ता.६ ) दिमाखात उद्‍घाटन झाले. नाट्यसंमेलनाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. ज्येष्ठ कलाकारांसह काही नवख्या कलाकारांनी आवर्जून सहभागी झाले होते. या संमेलनाविषयी मराठी नाट्य कलाकारांनी संमेलनाविषयी आनंददायी प्रतिक्रिया व्यक्त केल्‍या.

‘‘शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आम्ही साक्षीदार झालो आहोत. नियोजन अतिशय उत्तम आहे. सर्व कलाकार मित्र एकत्र आल्यावर खूप आनंद वाटला. संमेलनात सर्व कलाकारांनी यायला पाहिजे. हा अवर्णनीय सोहळा आहे.
- भरत जाधव, अभिनेता

‘‘नाट्यदिंडीत सहभागी होताना खूप वेगळा आनंद मिळतो. शंभरावे संमेलन अतिशय वेगळे आहे. सर्व मित्र एकाच छताखाली पुन्हा आले आहेत. नाट्य चळवळ अशीच बहरत राहो. मी हे संमेलन खूप एन्जॉय करतो आहे.’’
- सिद्धार्थ जाधव, अभिनेता

‘‘यापूर्वीच्या १५ ते २० नाट्यसंमेलनाला मी उपस्थित होतो. नाट्यसंमेलन ही खूप आनंदाची बाब आहे. प्रत्येक संमेलनात कार्यकर्ता म्हणून मी वावरतो. या नाटकांची महती सर्व देशभर पसरावी. परंतु महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरवस्था झालेली आहे. ती होता कामा नये.’’
- पुष्कर श्रोत्री, अभिनेता

‘‘आमच्यासारख्या नव्या कलाकारांना आमंत्रण मिळाले, यातच आनंद आहे. या ठिकाणी आल्यावर अतिशय छान वाटते आहे. सर्व ज्येष्ठ कलाकारांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे.’’
- स्पृहा जोशी, अभिनेत्री

‘‘एवढ्या मोठ्या संमेलनाचा आम्ही भाग झालो आहोत. प्रचंड गर्दी असूनही सर्वांसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. पुढील काळात देखील अशा संमेलनाचा मी भाग बनणार आहे. अशा सर्व संमेलनात मी उपस्थित राहणार आहे.’’
- गौरव मोरे, मराठी अभिनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com