बारणे पुस्तिका खापरे

बारणे पुस्तिका खापरे
Published on

सुसंवादी आप्पा


खासदार म्हणून श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी संसदेत दहा वर्षे काम केले आहे. आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा संपर्क व सुसंवाद नेहमीच असतो. नगरसेवक असताना त्यांच्यासोबत मी नगरसेविका म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम केले आहे. त्यांचा स्वभाव शांत, संयमी, मनमिळाऊ व इतरांना सहकार्य करण्याचा आहे. त्यांच्यातील माणूस आणि राजकारणी म्हणूनही त्यांचा स्वभाव चांगला आहे.
- उमा खापरे, सदस्या, विधानपरिषद, महाराष्ट्र

खा सदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांची व माझी राजकीय कारकीर्द एकाच वेळी म्हणजे १९९७ मध्ये सुरू झाली. ते व मी १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच नगरसेवक व नगरसेविका म्हणून निवडून गेलो होतो. महापालिकेत आम्ही एकत्र काम केले. ते त्यावेळी कॉंग्रेस पक्षात होते. आप्पा स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. त्यावेळी त्यांनी कधी विरोधाला विरोध केला नाही. त्यांची नेहमी सामंजस्याची भूमिका असायची. खासदार म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा संपर्क व सुसंवाद असतो.

कुटुंबवत्सल आप्पा
खासदार श्रीरंग बारणे यांचा स्वभाव शांत व चांगला आहे. एक व्यक्ती म्हणून ते चांगलेच आहेत. ते अतिशय प्रेमळ असून त्यांची कोणाशी वैर नाही. आपले कुटुंब सांभाळून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. आपल्या मुलांनाही त्यांनी चांगले शिक्षण देऊन प्रगतिपथावर नेले आहे.

विरोधकांशी सामंजस्य
मी नगरसेविका असताना माझी कामे मी करायची. माझा स्वभाव पहिल्यापासून असा आहे की, मी माझी कामे कोणाला सांगायची नाही. पण, स्थायी समितीमध्ये जी कामे नियमानुसार असतील ती कामे माझी व्हायची. त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नगरसेविका म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नाही. ते सर्वांना बरोबर घेऊनच काम करायचे. स्थायी समितीमध्ये वादविवाद न होता सर्वच पक्षातील लोकांची कामे होत होती.

शिवरायांचा पुतळा
महापालिकेत श्रीरंग बारणे यांनी सलग २० वर्षे काम केले. त्यांच्या नगरसेवकपदातील स्मरणात राहील असे काम म्हणजे त्यांनी थेरगावमधील डांगे चौकात उभारलेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. खडकावरून घोड्याने मारलेली झेप व हवेत आकाशाच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळपलेली तलवार अशा अतिशय वेगळ्या ‘पोज’मधील हा पुतळा राज्यात अन्य ठिकाणी पाहायला मिळत नाही. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मिळालेली ही मोठी देणगी आहे.

सहकार्याची भूमिका
खासदार म्हणून आप्पा बारणे यांनी दहा वर्षे काम केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व ते करत आहेत. पिंपरी, चिंचवडबरोबरच आपल्या संपूर्ण मतदारसंघातही त्यांचे चांगले काम आहे. भाजप-शिवसेना युती असताना ते शिवसेनेचे उमेदवार असल्याने आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांचे काम केले आहे. खासदार म्हणून त्यांच्याकडे आमचे फारसे काम निघत नसले तरी दिल्लीत कोणी गेले तर त्यांना हक्काने सांगतो. अगदी निम्म्या रात्रीही त्यांनी नागरिकांची महाराष्ट्र सदनात राहण्याची सोय केलेली आहे. त्यांची कायम सहकार्याची भूमिका राहिलेली आहे.
--
(शब्दांकन : जयंत जाधव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com