‘विराग’,‘बी अ स्पोर्टस्’चे विजय

‘विराग’,‘बी अ स्पोर्टस्’चे विजय

पिंपरी, ता.१० ः ‘व्हेरॉक चषक’ क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात ‘विराग’ आणि ‘बी अ स्पोर्टस’ने विजय मिळविले. अष्टपैलू रुद्र भगत (विराग) आणि गोलंदाज अर्णव धावरे (बी अ स्पोर्टस्) हे सामन्याचे मानकरी ठरले. अर्णव याने पाच बळी घेत अप्रतिम कामगिरी नोंदविली.
पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर १३ वर्षांखालील मुलांच्या गटात वरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या साखळी सामन्यात विराग क्रिकेट अकादमीने ‘स्पोर्टिव्ह’वर ८ गडी राखून विजय मिळविला. विजयी संघाचा सलामीवीर श्रेय असलेकर याने ७० चेंडूत नाबाद ७५ धावा फटकाविल्या. सामनावीर रुद्र भगत याने २४ धावा आणि ३ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात गॅरी कर्स्टन अकादमीला ‘बी अ स्पोर्टस्’ विरुद्ध खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी संघाच्या अर्णव धावरे याने भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचा निम्मा संघ तंबूत पाठविला.
संक्षिप्त धावफलक -
स्पोर्टिव्ह ः ३२ षटकांत सर्वबाद ११८ - अर्णव दिघुले २९, अंशुमन पोतदार २० (रुद्र भगत ३/११, विराट सुरतकर २/२३, विहान सुतार २/८) पराभूत वि. विराग ः २२ षटकांत २ बाद ११९- श्रेय असलेकर नाबाद ७५, रुद्र भगत नाबाद २४;
बी अ स्पोर्टस ः ३९ षटकांत ८ बाद २३४ - श्लोक पांडे ४२, स्वयम कांबळे ४० (वीर संचेती २/३६) वि.वि. गॅरी कर्स्टन ः ३४.५ षटकांत सर्वबाद १७९ - अर्णव सूर्यवंशी ५८, अर्यश सिंग २३ (अर्णव धावरे ५/४२)
PNE24U07220,PNE24U07221

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com