सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने आगीचा भडका होवून पाच जण जखमी

सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने आगीचा भडका होवून पाच जण जखमी

गॅस गळतीमुळे भडका होवून
दोन मुलांसह पाच जण जखमी

चिंचवडमधील विद्यानगर येथील घटना

पिंपरी, ता. १० : घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने भडका उडाला. त्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखसी झाले आहेत. ही घटना चिंचवडमधील विद्यानगर येथे घडली.
शंकर पोपट चव्हाण (वय ४०), अश्विनी शंकर चव्हाण (वय २८), सुशीला पोपट चव्हाण (वय ६६), करण शंकर चव्हाण (वय ९), स्वरा शंकर चव्हाण (वय ४) अशी जखमींची नावे आहेत. चव्हाण यांच्या घरातील सिलेंडमधून गॅस गळती झाली. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी घरात शंकर चव्हाण, त्यांची पत्नी अश्विनी, आई सुशीला चव्हाण व मुले करण व स्वरा होते. अचानक उडालेल्या भडक्यात पाचही जणांना भाजले. ही घटना समजताच शंकर यांचे मेहुणे तेथे आले. या सर्वांना उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या हाताला, पायाला पाठीला भाजले असून सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल शेटे यांनी सांगितले.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com