श्रीगणेश वाचनालयाच्या अध्यक्षपदी विक्रम दाभाडे

श्रीगणेश वाचनालयाच्या अध्यक्षपदी विक्रम दाभाडे

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २५ : श्रीगणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी विक्रम किसनराव दाभाडे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे. सुमारे १०५ वर्षाची वाटचाल सुरू असलेल्या श्रीगणेश वाचनालयामध्ये ६०० सभासद आहेत. एमपीएससी, यूपीएससी, पीएसआय, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सुसज्ज अभ्यासिका गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करून यशस्वी झाले आहेत.
संचालक कमिटीने २०२४-२५ साठी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- विक्रम दाभाडे, उपाध्यक्ष- दिनेश कुलकर्णी, चिटणीस- हर्षल गुजर, खजिनदार- यतीन शहा, अभ्यासिका विभाग प्रमुख- प्रशांत दिवेकर, हिशोब तपासणीस- पद्मनाभ पुराणिक या सर्व सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली असून, याचे वाचनालयाच्या वाचक वर्गाकडून स्वागत करण्यात आले.

PNE24U15872

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com