एम्पायर इस्टेट परिसरात वाहने अस्ताव्यस्त

एम्पायर इस्टेट परिसरात वाहने अस्ताव्यस्त

बेवारस गाड्या पडून
बिर्ला हॉस्पिटलकडून चिंचवडेनगरकडे जाताना डाव्या बाजूला पदपथावर बेवारस गाड्या पडून आहेत. ही अवस्था पदमजी मिलच्या प्रवेशद्वाराजवळची आहे.
- गुलाब बिरदवडे, दळवीनगर
NE24U13228

रॉयल रोहाना सोसायटी परिसरात कचऱ्याचे ढीग
चिंचवड येथे जकात नाक्याजवळील रॉयल रोहाना सोसायटीकडून चिंचवडेनगरकडे जाताना डाव्या बाजूला सात-आठ ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. जे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. येथे मोठी कचराकुंडी ठेवणे अत्यावश्यक आहे. तरी पालिकेने विनाविलंब योग्य ती कारवाई करावी.
- श्‍यामकांत खटावकर, चिंचवड
- 13233

मालाश्री हॉटेलसमोरील गटाराची दुरवस्था
पिंपरी येथील अशोक थिएटर रस्त्यावरील मालाश्री हॉटेलसमोरील गटाराची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. जवळच जयहिंद स्कूल, जिजामाता हॉस्पिटल आहे. या रस्त्यावर कायमच नागरिकांची वर्दळ असते. बस, खासगी वाहने या ठिकाणावरून जाताना खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होत आहे. लवकरात लवकर महापालिकेने या गटाराची दुरुस्ती करावी.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव
PNE24U13231

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com