अध्यक्षपदी प्रकाश निसळ यांची निवड

अध्यक्षपदी प्रकाश निसळ यांची निवड

पिंपरी, ता. २५ ः बिजलीनगर चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाची त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. घटनेत मंजूर असलेल्या पंधरा पदासाठी पंधराच सदस्यांचे अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी प्रकाश निसळ यांची निवड करण्यात आली. दिलीप पानसरे निवडणूक अधिकारी व अर्जुन माने यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः अशोक बळिराम भंगाळे (उपाध्यक्ष), जयवंत दाजीराव भोसले (कार्याध्यक्ष), मनोहर श्यामराव कोळंबे (सहकार्याध्यक्ष), मुरलीधर तुकाराम चोपडे (कोषाध्यक्ष), वाल्मीक दीपचंद शर्मा (सहकोषाध्यक्ष), सुनीता शरदचंद जयवंत, अनुराधा चैतन्य, मारुती मुळे, वैशाली चिटणीस, सुरेशसिंह तोमर, अनिल देशपांडे, दिलीप कांबळे, आशा पाटील, शालिनी थोरवे (सदस्य) यांची निवड करण्यात आली.

रमाई महिला बचत गटाची स्थापना
पिंपरी, ता. २५ ः मोरवाडी- म्हाडा येथे स्वामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका भोजने यांच्या मार्गदर्शनानुसार रमाई महिला बचत गटाची स्थापन करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारती शेगावकर यांनी वंदना घेतली. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा प्राजक्ता गायकवाड उपाध्यक्षा मुक्ता गायकवाड, सचिव श्रुती कालेकर, सविता कांबळे, मोहिनी वाडेकर, जयमाला मोरे, आशा मस्के, दीपक भोजने, ओंकार गायकवाड, शुभम खुडे उपस्थित होते. शिवनेरी सोसायटीशेजारी फुले-शाहू-आंबेडकर वाचनालय व ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. यावेळी चंद्रकांत गायकवाड, सदानंद गावकर, सुभाष सूर्यवंशी, माणिक चांदणे-मोरे, दशरथ अंगरखे, प्रदीप वाघमोडे उपस्थित होते.

साई तिरूपती ग्रिन्स सोसायटीत
प्रा. ढेंगळे यांचे मार्गदर्शन
पिंपरी, ता. २५ ः चऱ्होली-वडमुखवाडी येथील साई तिरूपती ग्रिन्स सोसायटीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक दादासाहेब ढेंगळे, प्राध्यापिका गीता कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेने झाली. लहान मुलांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी फिट अँन्ड वेल पँलेन्टच्या रश्मी ढेंगळे, सोसायटीचे अध्यक्ष काकड, सचिव राणे, खजिनदार नवले, संचालिका प्रियांका पांचाळ, प्रियांका मेश्राम उपस्थित होते. नियोजन सातपुते काका, स्नेहा सोनवणे, नीलेश सोनवणे, राजू कांबळे, विशाल सोनवणे, प्रणय वालोंद्रे व सुषमा वालोंद्रे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com