धुणीभांडी करणाऱ्या मातेच्या कष्टाचे ‘सार्थक’ 
थेरगावातील सार्थक जगताप ‘एनएमएमएस’ परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र

धुणीभांडी करणाऱ्या मातेच्या कष्टाचे ‘सार्थक’ थेरगावातील सार्थक जगताप ‘एनएमएमएस’ परीक्षेतील शिष्यवृत्तीस पात्र

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. २५ ः राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या थेरगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. डिसेंबर२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत महापालिकेच्या सार्थक तात्यासाहेब जगताप हा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. शहरातील महापालिका माध्यमिक शाळेतून तो एकमेव पात्र विद्यार्थी ठरला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षा घेण्यात आली. थेरगाव माध्यमिक विद्यालय विद्यालयातून १०० विद्यार्थी परीक्षार्थी होते. त्यातील आठ जण गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर एकाला शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका हर्षदा राऊत, मंगल आव्हाड, माधुरी साईखेडे, विद्यानंद सावंत, सोनाली जाधव, सुप्रिया तुपे, शुभम कोल्हे, ज्ञानेश्वर पुरी, तुषार पोघे, विठ्ठल आडे, नेहा जाधव, एकता राऊत, सुलभा कल्याणकर, रेखा लोंढे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.
इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे ः आरती नवनाथ गांधले, निस्सी शरद तेलोरे, सार्थक जगताप, मनस्वी सरोदे, अनिल पात्रे, सार्थक खळदकर, संस्कार कांबळे आणि मयुरी जगताप यांचा समावेश आहे. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून थेरगावच्या सार्थक तात्यासाहेब जगताप याने यश मिळवले आहे. आई धुणीभांडी करते, वडील फळांचा गाडा चालवतात. अशा परिस्थितीत शिक्षकांचे मार्गदर्शन व अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. आयएस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे सार्थकने सांगितले.


कोट
‘‘भविष्यात स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थी वळले पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून, या वर्षी १०० विद्यार्थी आम्ही परीक्षेला बसवले होते. त्यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त जादा तासिकेचे नियोजन केले होते. माझ्या सर्व शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम यांच्यामुळे विद्यालयाला हे यश प्राप्त झाले आहे.
- बाबासाहेब राठोड, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, थेरगाव

‘‘सार्थक जगतापचे यश हे महापालिका शाळांमधील मुलांसाठी प्रेरणादायी आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे विशेष अभिनंदन. महापालिकेच्या ‘भारत दर्शन’साठी सहलीसाठी सार्थकची निवड केली जाईल. ’’
-संगीता बांगर, प्रशासन अधिकारी,

फोटोः 15940

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com