खुनातील सराईत गुन्हेगार अखेर गजाआड

खुनातील सराईत गुन्हेगार अखेर गजाआड

पिंपरी, ता. २५ : अपहृत तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. नाव आणि पेहराव बदलून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने अपहृत तरुणाचा मृतदेह गुजरातमधील वापी येथे नेऊन जाळल्याचे तपासात उघड झाले आहे.
राहुल संजय पवार (वय ३४, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, पुणे) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर २०१३ पासून त्याच्यावर सात गुन्हे दाखल असून गुन्हा केल्यानंतर नाव, पेहराव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अखेर औंध येथे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
राहुल पवार याचा भाऊ रितेश याचा सहा जणांनी खून केला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. या खून प्रकरणातील एका आरोपीचा मित्र आदित्य युवराज भांगरे (वय १८) याने रितेशच्या खुनासंदर्भातील वादग्रस्त पोस्ट लाईक, शेअर केल्याने राहुल पवार आणि त्याच्या साथीदारांनी १६ मार्च २०२४ ला आदित्य भांगरे याचे अपहरण केले. त्यानंतर, आदित्य यास जीवे मारून त्याचा मृतदेह गुजरात वापी येथे नेऊन जाळला.
राहुल पवार स्वतःची ओळख लपविण्यासाठी मोबाईलचा वापर टाळायचा. डोक्यावरील केस, दाढी आणि मिशा काढल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलिसांनी त्याच्या संपर्कातील ६७ लोकांकडे चौकशी केली. तसेच तसेच तो वावरत असलेल्या कासारवाडी भागातील दुकाने, चौक व मेट्रो स्टेशनचे एकूण १२४ सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी करण्यात आली. याच काळात राहुल पवार औंध परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याने पेहराव, ओळख बदली होती. त्यामुळे, तो सागर संजय मोरे (रा. आळंदी) असे स्वतःचे खोटे नाव सांगत होता. मात्र, त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो राहुल पवार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com