‘एआय’ तंत्रज्ञानाने रोजगार पद्धतीत वेगाने बदल
अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन ः बदलांची जाणीव नसणारे स्पर्धेतून मागे राहतील

‘एआय’ तंत्रज्ञानाने रोजगार पद्धतीत वेगाने बदल अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन ः बदलांची जाणीव नसणारे स्पर्धेतून मागे राहतील

पिंपरी, ता. ८ : आर्टिफिशिअल इंटेलिजन्‍सच्या (एआय) बदलत्‍या तंत्रज्ञानामुळे शिक्षणात आणि रोजगारात वेगाने बदल होत आहेत. हे बदल समजून घेणे ही काळाची गरज आहे. स्‍पर्धेच्‍या युगातील या बदलांची जाणीव ज्‍यांना होणार नाही, ते स्‍पर्धेतून बाहेर फेकले जातील किंवा मागे राहतील. त्‍यामुळे एआय या तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे ही काळाची गरज असल्‍याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तसेच आयटी तज्‍ज्ञ अच्‍युत गोडबोले यांनी केले.

काळेवाडीतील रागा पॅलेस येथे आयोजित सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो या शैक्षणिक प्रदर्शनानिमित्त ‘एआय ः उद्याच्या जगातील बदलते तंत्रज्ञान’ या विषयावर गोडबोले बोलत होते. या वेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

गोडबोले म्‍हणाले, ‘‘देशात संगणकीय बदलामुळे काही गोष्टींमध्ये वेगाने बदल होत गेले. त्‍यामध्ये आता ‘एआय’चा उदय झाला आहे. एआय अनेक गोष्टी ओळखण्याचे काम करत आहे. विविध प्रकारचे लेखन, संगीत, वैद्यकीय क्षेत्र, वकिली आदीसह बहुतांश सर्वच क्षेत्रातील कामे या माध्यमातून केली जातील. यामध्ये मानवी स्‍वभावगुणांचा देखील समावेश असणार आहे. त्‍याचा परिणाम रोजगार आणि शिक्षण क्षेत्रावर होणार आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांनी नव्‍या तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्‍मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही शाखा निवडताना, त्‍या शाखेच्‍या मूलभूत गोष्टी समजून घ्यायला हव्‍यात. एआयच्‍या जमान्‍यात मूलभूत गोष्टी कायम राहणार आहेत. एआय तंत्र सातत्‍याने शिकणे गरजेचे आहे.’’

ही कौशल्‍ये आत्‍मसात करा
‘एआय’च्‍या बदलत्‍या तंत्रज्ञानाच्‍या काळात काही कौशल्‍ये आत्‍मसात करणे आवश्‍यक आहे. यामध्ये बदलत्‍या तंत्रज्ञानाला साजेसा व्‍यक्तिम‍त्‍वामध्ये बदल करणे, व्‍यावसायिकतेमध्ये गरजेची असलेली इंग्रजी भाषा शिकणे यासह आपल्‍या भाषांवरही प्रभुत्व हवे. आपले म्‍हणणे योग्य पद्धतीने मांडणारे बना. टीम वर्कवर भर द्या. तसेच स्‍वतःचे काही तरी करू शकतो का? यावर अधिक भर देणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन अच्‍युत गोडबोले यांनी केले.
फोटोः 24856, 24857

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com