हॉटेल व्यावसायिकाची 
नकली नोटा देऊन फसवणूक

हॉटेल व्यावसायिकाची नकली नोटा देऊन फसवणूक

निगडी : तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यावसायिकाकडून दहा लाख रुपये घेऊन त्याबदल्यात नकली नोटा देत फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई निगडीतील ट्रान्स्पोर्टनगर येथे घडली. याप्रकरणी शुभम भगवान सोनवणे (रा. भागेश्वर कॉलनी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आकाश सत्यवान शेटे (वय ३०, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव, पुणे), सचिन एकनाथ नरवडे (वय ३७, रा. सस्ते चौक, मोशी) या दोघांना अटक केली असून तुषार टेके व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादीला फसविण्याचा उद्देशाने त्याचा विश्वास संपादन करून तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून दहा लाख रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात फिर्यादीला नकली नोटा देऊन त्यांची फसवणूक केली.

ज्वेलर्समधील सेल्समनला अटक
पिंपरी : ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या सेल्समनने कॅश काउंटरमधील सव्वा तीन लाखांचे सोन्याचे दागिने परस्पर घेऊन गेल्याप्रकरणी सेल्सनमनला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील डीलक्स मॉल येथील ज्वेलर्समध्ये घडला. अक्षय अशोक पोतदार (वय ३५, रा. दुर्गादेवी कॉलनी, भोसरी, मूळ - रा. कुंभारगाव, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार प्रताप जाधव (रा. पिंकसिटी रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या सराफ दुकानात सेल्समन म्हणून नोकरीस असून फिर्यादीने दुकानाच्या व कॅश काउंटरच्या चाव्या आरोपीकडे सोपविल्या. दरम्यान, आरोपी कॅश काउंटरच्या ड्रॉवरमधील तीन लाख १७ हजार ३३३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काढून घेऊन गेला.

मोठ्याने बोलत असल्याने हातोड्याने मारहाण
दिघी : मोठ्याने बोलतो म्हणून एकाने हातोड्याने मारहाण केल्याची घटना वडमुखवाडी येथे घडली. हरिदास रामेन मुजुमदार (वय ३२, रा. बालाजी मंदिराजवळ, वडमुखवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कमलकुमार ब्रीजाचंद्र दास (रा. लेबर कॅम्प, बालाजीनगर, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि विश्वजीत शहा त्यांच्या खोलीत जेवण करीत असताना मोठमोठ्याने बोलत होते. त्यावेळी बाजूच्या खोलीत राहणारा आरोपी हरिदास हा फिर्यादी यांच्या खोलीसमोर आला व एवढ्या जोरात कशाला ओरडता, असा म्हणाला. त्यावर विश्वजीत म्हणाला की, तू कशाला आम्हाला विचारतो. असे म्हणताच आरोपीने त्याच्या घरातून छोटी हातोडी आणून विश्‍वजित यांच्या डोक्यात मारून जखमी केले.

पिशवी फाडून दागिने लंपास
पिंपरी : सोने खरेदी करून जात असताना महिलेच्या हातातील कापडी पिशवी फाडून त्यातील ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना पिंपरी मार्केटमध्ये डीलक्स रोड येथे घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com