चिंचवडमध्ये चोरट्यांनी महिलेचे दागिने हिसकावले

चिंचवडमध्ये चोरट्यांनी 
महिलेचे दागिने हिसकावले

पिंपरी, ता. ८ : नातवासह पायी जाणाऱ्या आजीचे पाठीमागून अचानक आलेल्या एका महिलेने डोळे झाकले तर दुसऱ्या महिलेने ‘तू आम्हाला तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढून दे नाहीतर तुझ्या नातवाला पळवून नेऊ’ अशी धमकी देत आजीचे सोन्याचे दागिने हिसकावले. ही घटना कृष्णानगर, चिंचवड पोलिस वसाहतीपासून काही अंतरावर घडली.
या प्रकरणी कृष्णानगर पोलिस वसाहतीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या सून पोलिस कॉन्स्टेबल आहेत. त्या निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून, कृष्णानगर पोलिस वसाहतीत वास्तव्याला आहेत. येथेच फिर्यादी रहायला आहेत. दरम्यान, फिर्यादी या त्यांच्या नातवाला घेऊन कृष्णनगर येथील मैदानाजवळील रस्त्यावर फिरण्यास गेल्या होत्या. त्या पायी घराकडे येत असताना अचानक दोन महिला पाठीमागून आल्या. त्यातील एका महिलेने फिर्यादीचे डोळे हाताने झाकले. तर दुसऱ्या महिलेने फिर्यादीला धमकी देत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील कर्णफुले व पायातील चांदीचे पैंजण जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर महिला पसार झाल्या.
-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com