स्वामी लिलाशाह महाराज यांची जयंती उत्साहात

स्वामी लिलाशाह महाराज यांची जयंती उत्साहात

पिंपरी, ता. ४ : परम पूजनीय संत शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील झुलेलाल मंदिर (लाल मंदिर) येथे सिंधी समाजातील लाडी समाजाच्या स्वामी लिलाशाह प्रचार मंडळाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सोळा मुलांचा सामुहिक उपनयन (जेनेयु) संस्कार सोहळा तसेच सिंधी समाजातील एका सामान्य कुटुंबातील मुलीचा व मुलाचा सामुहिक खर्चातून विवाह करण्यात आला.
या धार्मिक विधीसाठी फुरसुंगी येथील स्वामी महादेव दास उदासी, रामदारा येथील परम पूज्य हेमंतगिरी महाराज, पिंपरी येथील सोनू साई, दीपक साई आदी उपस्थित होते. सोहळ्या दरम्यान, भजन, सामुहिक आरती तसेच धार्मिक संस्कार करण्यात आलेल्या मुलांची व नवदाम्पत्याची रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सिंधी समाजातील शिवदास पमनानी, परमानंद जमतानी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, धनराज मंघनानी आदी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष प्रथु तिर्थानी, दिपक लोहाना, मोती रामवानी, कन्हैयालाल गंगवानी, अशोक खेमचंदानी, गोपाल त्रिलोकानी, जॉनी थडानी, भगवान लालवानी, सीमा लालवानी, वर्षा लोहाना, दिपा रेलवानी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com