निवडणूकीच्या कामकाजासाठी थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल

निवडणूकीच्या कामकाजासाठी थेरगाव परिसरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, ता. १० : लोकसभा निवडणुकीसाठी थेरगाव येथील महापालिका कामगार भवन येथे चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतपेटीचे वाटप होणार आहे. येथून कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणे व परत आणण्यासाठी १३८ लहान-मोठ्या वाहनांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने तापकीर चौकाकडून थेरगावकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून या मार्गावरील वाहने काळेवाडी रस्त्याने काळेवाडी फाटा मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच, थेरगाव पोलिस चौकी येथून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून या मार्गावरील वाहने थेरगाव पोलिस चौकी येथून उजवीकडे वळून पाण्याच्या टाकीमार्गे पुढे जातील. माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून या मार्गावरील वाहने चौकातून उजवीकडे वळून ‘ग’ प्रभाग कार्यालयाच्या रस्त्याने इच्छितस्थळी जातील.

हा बदल रविवारी (ता. १२) पहाटे पाच वाजल्यापासून सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपर्यंत अथवा मतपेट्या जमा होईपर्यंत असेल. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com