कामगारांच्या हितासाठी विजयी करा

कामगारांच्या हितासाठी विजयी करा

पिंपरी, ता. १० : ‘‘महाराष्ट्रातील लहान, मोठे उद्योगधंदे स्थलांतरित होत आहेत. विविध कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार हिरावून घेतला जात आहे. तर कामगारविरोधी कायदे करणाऱ्या सरकारला खाली खेचण्यासाठी आणि कामगारांच्या हितासाठी महाविकास आघाडीला विजयी करा,’’ असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) केले आहे.
संजोग वाघेरे-पाटील यांनी प्रचार करताना चिंचवड येथील टाटा मोटर्स कामगारांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मावळ लोकसभा प्रचारप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, राम दातीर पाटील, अमोल भोईटे यांच्यासह घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांशी संवाद साधताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, ‘‘तरुणांना रोजगार देण्याच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला खाली खेचायचे आहे. कंपन्या गेल्यामुळे हजारो-लाखो तरुणांच्या हातचे काम निघून गेले असून बेरोजगारीच्या विळख्यात आजचा सुशिक्षित तरुणवर्ग सापडला आहे. अशिक्षित, अकुशल कामगारांचे, तर हालच होत आहेत. पुण्यासारख्या शहरात रोजगाराची मोठी संधी आहे. सरकारने तळेगाव एमआयडीसी, आयटी पार्कमधील किती कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. किती कंपन्या बंद पडल्या आहेत, याचाही खुलासा करावा.’’ या वेळी एकनाथ पवार, मारुती भापकर यांनी देखील उपस्थित कामगारांना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी अवगत गेले. ही लोकसभा निवडणूक शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निर्णायक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना निवडून कामगारांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com