तडीपार आरोपीकडून 
बनावट नोटा जप्त

तडीपार आरोपीकडून बनावट नोटा जप्त

पिंपरी, ता. १० : कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेल्या तडीपार आरोपीकडून बनावट चलनी नोटा व चोरीची तेरा वाहने हिंजवडी पोलिसांनी जप्त केली.
अक्षय ऊर्फ सोन्या काळूराम हुलावळे (वय २९, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अक्षय याला २० नोव्हेंबर २०२३ ला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या. बनावट नोटांच्या गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली असून, त्यांच्याकडून या नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद वाई येथून जप्त केले आहे. तर या गुन्ह्यात अक्षय फरार होता.
दरम्यान, अक्षय याच्यावर यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून दहा दुचाकी व दोन रिक्षा अशी बारा चोरीची वाहने जप्त करण्यात आली. त्याच्याकडून हिंजवडी पोलिस ठाण्यातील तीन, वाकड, वारजे, कामशेत व पिंपरी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर इतर चार वाहनांचा तपास सुरु आहे. अक्षय हुलावळे हा सराईत गुन्हेगार असून. त्याच्यावर वाहनचोरीसह इतर असे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com