बारणे यांच्या प्रचारासाठी
मुख्यमंत्र्यांचा आज रोड शो

बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा आज रोड शो

पिंपरी, ता. १० : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता. ११) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड शहरात महा रोड शो होणार आहे.
चिंचवड येथील चापेकर चौकातून सकाळी नऊला मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ होईल. चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम. एम. स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर १६ नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग असणार आहे. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ महा रोड शो व प्रचाराची सांगता होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com