८५ वर्षांवरील ९३ टक्के ज्येष्ठांकडून मतदान

८५ वर्षांवरील ९३ टक्के ज्येष्ठांकडून मतदान

पिंपरी, ता. ११ ः दिव्यांग, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी गृहमतदान प्रक्रिया राबवली जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शनिवारपर्यंत (ता. ११) एक हजार दोन मतदारांनी मतदान केले आहे. यात ८५ वर्षांवरील २६३ पैकी २४५ अर्थात ९३.१५ टक्के ज्येष्ठांनी मतदान केले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन केली आहेत. मावळ मतदारसंघात सात ते नऊ मे दरम्यान ही मतदान प्रक्रिया झाली. त्यानुसार, एक हजार ६२१ मतदारांपैकी एक हजार दोन मतदारांनी मतदान केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. ४५ दिव्यांगांपैकी ४० मतदारांनी मतदान केले आहे. शासकीय सेवेतील मतदारांची संख्या ७५८ आहे, त्यातील २९ जणांनी मतदान केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त ६८५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहेत.

मतदार चिठ्ठी वाटप
मावळ लोकसभा मतदारसंघातील २५ लाख ८५ हजार १८ मतदारांपैकी २३ लाख ३९ हजार ४१३ अर्थात ९०.५० टक्के मतदारांना मतदार चिठ्ठीचे (वोटिंग स्लीप) वाटप केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com