‘मावळा’तील परवाना प्राप्त ३ हजार ५३५ शस्रे जमा

‘मावळा’तील परवाना प्राप्त ३ हजार ५३५ शस्रे जमा

पिंपरी, ता. ११ ः ‘‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मावळ मतदारसंघातील परवाना प्राप्त तीन हजार ५३५ शस्त्रे जमा केली आहेत,’’ अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. पोलिस अधिकारी, सुरक्षा रक्षक, राजकीय व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडील शस्रे जमा केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई पोलिस आयुक्तालय, पुणे व रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांकडून एकूण चार हजार ४४४ शस्त्रे परवाने दिले आहेत. त्यात पनवेल (७८१), कर्जत व उरण (१,६९१), मावळ (१८०), चिंचवड व पिंपरी (१,७९२) या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

दीड कोटींची रोकड जप्त
लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून शनिवारपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत वाहन तपासणी नाके स्थापन केली आहेत. वाहन तपासणी दरम्यान शनिवारपर्यंत (ता. ११) एक कोटी ४९ लाख ८० हजार ८१० रुपये रोकड जप्त केली आहे. तसेच ६९ लाख ४० हजार ६४७ रुपये किमतीचे एक लाख ९१ हजार ९१ लिटर मद्य; ६२ लाख ४७ हजार ९७५ रुपये किमतीचे १२ किलो अमली पदार्थ; एक कोटी ९८ लाख रुपयांचे पावणेतीन किलो सोने आणि एक हजार १०८ रुपयांचे अन्य साहित्य जप्त केले आहे. २७७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई
मावळ मतदारसंघातील पाच हजार ९२२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील ८५३, पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रांतील एक हजार ४४३, पनवेलमधील २७१ आणि कर्जत व उरण तालुक्यांतील तीन हजार ३५५ जणांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com