मतदान केंद्राजवळ मोबाईल वापरावर निर्बंध

मतदान केंद्राजवळ मोबाईल वापरावर निर्बंध

पिंपरी, ता. ११ : निवडणूक सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत काही बाबींना निर्बंध असतील. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हे आदेश दिले आहेत.

खालील बाबींना असेल निर्बंध
- मतदान केंद्रात तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्री-सायडींग ऑफिसर, निवडणूक कामकाज संदर्भात नेमलेले शासकीय व्यक्ती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले शासकीय व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबाईल फोन, स्मार्ट फोन, वायरलेस किंवा संपर्क साधने वापरण्यास मनाई
- मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात पक्ष कार्यालय उभारण्यास मनाई
- संरक्षण प्राप्त व्यक्तींना मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात सुरक्षा रक्षकासह प्रवेशास मनाई.
- केंद्राच्या दोनशे मीटर आतमध्ये इलेक्शन बूथ लावण्यास, प्रचारास तसेच दोनशे मीटर त्रिज्यामध्ये वाहन आणण्यास मनाई.
- स्पीकर, मेगाफोन, आरडाओरडा करणे, गोंधळ करणे अशा प्रकारांस मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मनाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com