शहरात नवीन वाहनांची पडणार भर

शहरात नवीन वाहनांची पडणार भर

पिंपरी, ता. १४ : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे यावर्षी नव्‍याने ५ हजार २२८ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये १ हजार ५२१ चारचाकी आणि तीन हजार ८३ दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

अक्षय्य तृतीयेच्‍या शुभ मुहूर्तावर घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत देखील यंदा वाहनांची मोठी नोंद झाली आहे. यंदा १ ते १० मे दरम्यान सुमारे ५ हजार २२८ वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २ हजार ७५७ दुचाकी, तर १ हजार २३२ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. तीनचाकी प्रवासी रिक्षाच्‍या खरेदीलादेखील यंदा अनेकांनी प्राधान्‍य दिले. यावर्षी ११९ प्रवासी रिक्षांची नोंद झाली आहे. याबरोबरच दोन रुग्णवाहिका, ३७ बसेसचीदेखील नोंदणी करण्यात आली असल्‍याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

चार्जिंग स्‍टेशनचा अभाव
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला नागरिकांची पसंती मिळत आहे. त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन उभारणे गरजेचे आहे. मात्र, चार्जिंग स्‍टेशन नसल्‍याने इलेक्ट्रिक वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तसेच शासनाने इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान बंद केल्यामुळे ई-वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. त्‍यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

नोंदणी झालेल्‍या वाहनांची संख्या
- मोटार सायकल/ स्‍कूटर - ३०८३
- मोटार कार - १५२१
- गुड्स कॅरिअर - २०९
- मोटार कॅब - १४८
- तीनचाकी प्रवासी रिक्षा - ११९
- उर्वरित - १४८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com